गुरुवार, ३० मार्च, २०२३

महात्मा बसवण्णा बोलले आज

         🔯महात्मा बसवेश्वर बोलले आज🔯


समतानायक 

वेळ आहे का थोडा ?
चार शब्द सांगायचेत,
राहवत नाही म्हणून
काही जबाब मागायचेत !

आधी आभार मानतो
मोठं केलत मला
पण खरंच सांगतो तुम्ही
खोटं केलत मला !

अवघ्या तुमच्या जीवनात
व्यापून टाकलत मला
मनात सोडून सगळीकडे
छापून टाकलत मला !

नाव माझं घेतलत
सण माझे केलेत
माझे अनुयाई म्हणून
राडे सुद्धा केलेत !

एवढ्यावर थांबला नाहीत
मला देवासोबत बसवलत
वाईट वाटतंय म्हणताना
पण तुम्ही मला फसवलत !

माझे विचार घेतले नाहीत
माझे आचार घेतले नाहीत
चरित्र माझं ओरबाडलत
पण त्याचे सार घेतले नाहीत !

नुसते प्रताप आठवू नका रे
तत्व सुद्धा जपा
स्मारक पुतळे झगमग नको
माझे वचन जपा !

निष्ठा धैर्य न्याय नीती
तत्व माझी कुठे गेली ?
अरे तुम्ही सगळे माझेच ना
मग तुमची एकी कुठे गेली ?

काय नक्की साधायचंय
कशात भूषण आहे
हा विचार केला नाहीत
तर सगळंच कठीण आहे

स्वाभिमानात सामर्थ्य आहे
त्याच्या जागी माज नको
आणि आहे जिथे स्वाभिमान
तिथे मुळीच लाज नको !

असो; याहून काय सांगू
तुमचा काळ वेगळा आहे !
पण असे नका वागू ज्याने
मला वाटेल मी एकटा आहे ߙ!

कवी - अनंत पाटील, मुरूम
(संपर्क-9096416141)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

महात्मा बसवेश्वर - बसवण्णांच्या मार्गावरती सदैव आम्ही चालत राहू.

बसवण्णांच्या मार्गावरती सदैव आम्ही चालत राहू. 🔯 महामानव 🔯   आमचे विचार पेरणं मनात थोडं अवघड आहे ।  आमचे विचार पेरणं समाजात हे पण अजुन अवघड...